मुंबईः सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना शुक्रवारी मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. पीएमएलए कायद्याअंतर्गत दोघांवर कारवाई झाली. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली होती. आज सकाळी ११ वाजता दोघांनाही पीएमएलए कोर्टात हजर केलं जाणार आहे.

वाचाः

शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई व नागपूरच्या घरी धाड टाकल्यानंतर देशमुखांची दुपारी कसून चौकशी करण्यात आली होती. तर संध्याकाळी ईडीच्या कार्यालयात त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांचीही चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री ११नंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

अनिल देशमुखांच्या सहकाऱ्यांच्या अटकेनंतर भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केलं आहे. वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांचे सचिन संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली आहे. पुढील काही दिवसांत अनिल देशमुखांनाही अटक होईल, असं ट्वीट सोमय्यांनी केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टेलिया या घराजवळ एका गाडीत स्फोटके सापडल्यानंतर, मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी, ईडीने याप्रकरणी माजी पोलीस निरीक्षक सचिन वाझेचीदेखील चौकशी केली. अनिल देशमुख यांनी पैशांचा गैरवापर केला, असा ईडीला संशय आहे. त्यातूनच ईडीने देशमुख यांची याआधी चौकशी केली होती. त्या चौकशीनंतर शुक्रवारी छापे टाकण्यात आले.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here