सोलापूर: एकीकडे राज्यावर डेल्टा प्लसचे संकट घोंगावत असताना सोलापूर जिल्ह्यातील पालकांची आपल्या मुलांच्या प्रति चिंता वाढली आहे. कारण जिल्ह्यात जवळपास २० बालकांना करोनाची बाधा झाल्याची तर १५ हजार बालकांना करोना सदृश्य लक्षणे असल्याची धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या तपासणीत समोर आली आहे.

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सुमारे नऊ लाख बालकांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. ‘मुलं माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत साधारण सव्वा लाख बालकांची तपासणी झाली असून त्यापैकी २० बालकांची चाचणी करोना पॉझिटिव्ह आली आहे. तर पंधरा हजार मुलांमध्ये करोना सदृष्य आजाराची लक्षणे असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.

वाचाः

सध्या राज्यात कोव्हिड-१९ च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे संभाव्य येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश करण्यात आले आहेत.आपत्ती व्यवस्थापन २००५ च्या कायद्याअंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत कोव्हिड-१९ची साखळी तोडण्यासाठी वेळोवेळी विविध आदेशांद्वारे राज्यात निर्बंध लागू केले आहेत.

वाचाः

महाराष्ट्र राज्यात कोव्हिड-१९चा धोका कायम असल्याने तसेच डेल्टा, डेल्टा प्लस या कोव्हिडच्या नव्या व्हेरिएंट्सचा प्रसार होत असून लवकरच (४ ते ६आठवडे) कोव्हिडची तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं बालकांबाबत सोलापूर जिल्ह्यात सदरची आकडेवारी समोर येताच सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही सोलापूर जिल्ह्यातील पालकांना आपल्या पाल्याची काळजी घेण्याची आवाहन केले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here