सिंधुदुर्ग: स्पेशल गाडीच्या इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरून मार्गावर अपघात झाला आहे. सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही.

जिल्ह्यातील उक्षी आणि भोके दरम्यान करबुडे बोगद्यामध्ये आज पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त राजधानी एक्स्प्रेस गोव्याच्या दिशेनं निघाली होती. मुंबईपासून सुमारे ३२५ किलोमीटरवर असलेल्या करबुडे बोगद्यातील ट्रॅकवर दरड कोसळल्यानं इंजिनाचं पुढील चाक रुळावरून घसरलं.

वाचा:

अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे देखभाल दुरुस्ती वाहन व वैद्यकीय उपचारांची सुविधा असलेले वाहन रत्नागिरीहून घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघात बोगद्यात झाल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही काळ ठप्प राहणार आहे. इंजिन रुळावरून बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. मार्गावर धावणाऱ्या विविध गाड्या सध्या नजीकच्या स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.

वाचा:

रायगडमधील रोहा ते कर्नाटकातील मँगलोर दरम्यानच्या ७५६ किलोमीटर मार्गावर कोकण रेल्वे धावते. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक अशा तीन राज्यांतून गेलेल्या कोकण रेल्वेच्या मार्गावर अनेक नद्या, खोल दऱ्या आणि टेकड्या आहेत. त्यामुळं वाहतुकीच्या दृष्टीनं हा मार्ग अत्यंत आव्हानात्मक मानला जातो. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या मार्गावर अपघाताच्या छोट्या-मोठ्या घटना घडत असतात.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here