मुंबईः करोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस रुग्ण आढळल्यानं राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांना आणि महापालिकांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधच लागू करावे लागणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपनं सडकून टीका केली आहे.

डेल्टा प्लसचे रुग्ण राज्यात आढळल्यानं अनलॉकच्या बाबतीत राज्य सरकारने सावध भूमिका घेतली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमावली लागू करण्यात येणार नाही. दुकानांच्या वेळाही कमी करण्यात आल्या आहेत. यावरुन भाजप आमदार यांनी सरकारवर टीका केली आहे.

वाचाः

अतुल भातखळकर यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘डेल्टा विषाणूपासून बचाव की पळ? महाराष्ट्राला पुन्हा बंदी राष्ट्र बनवू पाहत आहेत. दुपारी चार वाजताच शहराला टाळं लागणार आहे. रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरु होणार आहे,’ अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

वाचाः

राज्यात पुन्हा निर्बंध
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हळुहळू होत असलेली करोना रुग्णसंख्येतील वाढ तसेच, डेल्टा आणि डेल्टा प्लस या स्वरूपाचे आढळलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारने शुक्रवारी नवी नियमावली लागू केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांना आणि महापालिकांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधच लागू करावे लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना आणि महापालिकांना याशिवाय वेळोवेळी राज्य सरकारने दिलेले आदेश आणि करोना रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here