मुंबईः छत्रपती शाहू महाराज जयंतीदिनी ओबीसींच्या आरक्षणावरून भाजपच्यावतीने राज्य सरकारविरोधात आंदोलन केले जाणार आहे. भाजपने चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे. आज सकाळी ११ वाजल्यापासून राज्यातील विविध शहरात भाजप नेते व कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच, मुंबईतही भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर, आमदार आशिष शेलार आणि मनोज कोटक यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. औरंगाबाद येथेही भाजपच्या चक्का जाम आंदोलनावेळी पोलिसांनी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष उमा खापरे, खासदार डॉ भागवत कराड, आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या सह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

वाचाः

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात पुण्यातील कात्रज चौकात आंदोलन होत आहे. यावेळी ‘ओबीसींच्या पाठीशी भाजप खंबीर उभा असून आरक्षण लागू होईपर्यंत निवडणूका होऊ देणार नाही,’ असा इशाराच पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात दाभोळकर कॉर्नर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. भाजपनं केलेल्या आंदोलनामुळं काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

वाचाः

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here