‘आम्ही निवडणुका होऊ देणार नाही असं म्हटल्यावर धुळे, नंदुरबार, पाच जिल्ह्याच्या निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुक आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सरकारी अधिकारी एक पत्र देतात. पण, त्यासाठी सरकारने एक समिती गठन करावी व त्यात विरोधी पक्षाला सोबत घेऊन निवडणुक आयोगाला निवडणुक पुढे ढकलण्याची विनंती करण्याची पत्र दिले तर निवडणुका पुढे ढकलता येतील. पण हे सरकार आरक्षण रद्द होण्याची वाट पाहत आहे, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसंच, लागू होईपर्यंत राज्यात निवडणुका होऊ देणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.
वाचाः
‘राज्य सरकार छोटं मन ठेवून मोठे होऊ शकत नाही. तुम्ही चुकून सत्तेत आलात पण एक लक्षात ठेवा भविष्यात कोणी तुम्हाला दारावरदेखील उभं करणार नाही, अशी टीका मुंडेंनी केली आहे. त्याचबरोबर, मी ओबीसींना सांगू इच्छिते, आपलं मन तुटू देऊ नका. संघर्षाची भावना तुटू देऊ नका. ओबीसींच्या पाठीमागे भाजपा खंबीरपणे उभी आहे,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
‘मी मंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा ओबीसींचे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरती गेले होते. याच्याविषयी कोर्टाच्या तारखा चालू होत्या ते आरक्षण कसे योग्य आहे हे सांगण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये काही डाटा सबमिट करत होतो. आम्ही काही सर्व्हेदेखील करत होतो. तेवढ्यात आचार संहिता लागली त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि जवळपास पंधरा महिने झालं हे सरकार फक्त कोर्टाकडून तारखाच घेत आहे. इंपिरिकल डेटाच्या आधारे कृष्णमूर्ती यांच्या मतांच्या आधारावर सरकारने हा सगळा डाटा सबमिट करावा असं त्यांनी सांगितलं पण या सरकारने पंधरा महिन्यांमध्ये कुठलाही डाटा तयार केला नाही,’ असा आरोपही पंकजा मुंडे यांनी केला आहे.
वाचाः
‘ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्द्यासाठी आम्ही चक्काजाम केलं. तेव्हा सरकारी पक्षही आंदोलनाची भाषा करायला लागले. मंत्री असतानाही आंदोलनाची भाषा करतात हे शोभतं का तुम्हाला?, असा सवाल करतानाच आम्ही सत्तेत असताना आंदोलन केलं का? आम्ही आरक्षण दिलं. मंत्री असूनसुद्धा तुम्ही आंदोलनाची भाषा करतात. मंत्र्यांनी निर्णय करायचे असतात. आंदोलन करायला आम्ही रस्त्यावर उतरलोय, असा चिमटा पंकजा मुंडे यांनी काँग्रेसला काढला आहे. तसंच, हे आंदोलन तुमच्या नाकर्तेपणामुळं होतंय,’ असा टोलाही लगावला आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times