म. टा. वृत्तसेवा, जुन्नर

महाविकास आघाडी सरकारकडून शिवनेरीवर साजऱ्या होत असलेल्या पहिल्याच शिवजयंती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवनेरीवरील ” प्रकल्पाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारच्या काळात जुन्नर तालुका ‘पर्यटन तालुका’ म्हणून घोषित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर रोप वे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आताच्या महाविकास आघाडी सरकारच्या विचाराधीन आहे. ‘रोप वे’च्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळेच आज, शिवजयंतीच्या दिवशी रोप वे प्रकल्पाची घोषणा होण्याची शक्यता आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हेदेखील ‘रोप वे’साठी आग्रही आहेत. शिवनेरीवर रोप वे व्हावा, अशी मागणी त्यांनी संसदेत केली होती. जुन्नरचे आमदार अतुल बेनकेही या प्रकल्पासाठी आग्रही आहेत. त्यांनी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. रोप वे झाल्यास किल्ले रायगडप्रमाणे किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांचा ओघ वाढू शकेल. सरकारने जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित केल्यानंतर रोप वे प्रकल्प पर्यटनवाढीस पूरक ठरणार आहे. शिवजयंती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोप वे प्रकल्पाची घोषणा करतील का, याची उत्सुकता जुन्नरवासीयांना आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here