परभणी : परभणी शहरातील दर्गा रोड परिसरात शुल्लक कारणातून दोन गटात सिनेस्टाईल राडा झाल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी गोळीबारासह तलवारीने सपासप वारही करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहराच्या मध्यवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने शहर हादरून गेलं आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना ज्या ठिकाणी घडली त्याच ठिकांनी असलेल्या cctv मध्ये कैद झाली. पोलिसांनी cctv फुटेजच्या आधारे परस्पर विरोधात दोन गुन्हे दाखल केले असून दोन असरोपींना अटक ही करण्यात आली आहे तर इतर फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.

गुरुवारी 24 तारखेला दुपारच्या सुमारास दर्गा रोड परिसरात इमरान झैन हा युवक आपल्या स्कुटीवर जात असतांना त्याच्या स्कुटीने मुलीला धक्का लागण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्याचा काही युवकांशी वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यानंतर वादाचा रूपांतर हाणामारीत झालं. इमरान याने आपल्या जवळील देशी काट्याने (रिव्हॉल्व्हर) दोन फैरी झाडल्याचे cctv मध्ये दिसून येत आहे.

यातील एक राउंड हवेत फायर करण्यात आला तर दुसरी गोळी नजिकच्या कारला लागली. दरम्यान, काही युवकांनी हातात तलवारी घेऊन इमरानवर जिवघेणा हल्ला केला. या प्रकरणात आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here