नांदेड : अशोक चव्हाण यांनी अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईच्या संदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार टीका केली आहे. सध्या राज्य सरकारमधील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडीची कारवाई म्हणजे राजकीय सूडबुद्धीची कारवाई असल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण केंद्र सरकारवर केली आहे. ते आज नांदेडमध्ये बोलत होते.

एकीकडे कोरोनाचा जीवघेणा संसर्ग तर दुसरीकडे राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण तापलेलं पाहायला मिळतं. ओबीसी आरक्षण प्रकरणी आज भाजपकडून राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. यावर चोख प्रत्युत्तर देत काँग्रेसनेही मोदी सरकारविरोधात आंदोलन पुकारलं आहे. देशातील आरक्षणाची पद्धतच भाजपला संपवायची आहे अशी टीका मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज निदर्शने केली. यावेळी माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान, ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्या प्रकरणी भारतीय जनता पार्टीतर्फे शनिवारी गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. याच दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पलटवार करीत समोरासमोर आंदोलन करत ‘मोदी सरकार हाय हाय’च्या घोषणा दिल्या. तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनीही राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

दोन्ही पक्षाकडून एकमेकांच्या आंदोलनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्याने गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात चांगलेच राजकारण तापल्याचे चित्र दिसून आले. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले याला राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार नाही तर हे भाजपचेच पाप आहे, असा पलटवार कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या चंदा कोडवते यांनी केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here