मुंबई : मुंबईतील ताज हॉटेल पॅलेसमध्ये आज दोन बंदूकधारी घुसल्याची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. पण याचा अधिक तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन एका नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केला होता. खरंतर, मुंबईतील ताज हॉटेलमध्ये गोंधळ उडाला जेव्हा दोन बंदूकधारी ताज हॉटेलमध्ये प्रवेश करणार आहेत असा फोन आला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम सुरू केली.

हा फोन नेमका कोणी केला याची चौकशी केला असता हाती काही लागलं नाही. ताजच्या व्यवस्थापनाने फोन केल्यावर मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळवण्यात आले. हा फोन कॉल एका मुलाने केला होता आणि त्यामध्ये गंभीर काहीही आढळले नाही. इतकंच नाहीतर अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी अधिकृतपणे दिली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ताज हॉटेल पॅलेसमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी आज कॉल आला होता. कारण दोन अज्ञात बंदूकधारी हॉटेलमध्ये प्रवेश करणार असल्याचे फोन करून सांगण्यात आले होते. तपासणीत हा बनावट कॉल असल्याचे निष्पन्न झाले आहे. कॉल करणार एक 14 वर्षाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. या फोनबद्दल आपल्याला काहीच कल्पना नव्हती अशी माहिती मुलाच्या वडिलांनी दिली आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here