वाचा:
राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटसोबतच करोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने आरोग्य यंत्रणेपुढील डोकेदुखी वाढली आहे. एकंदर स्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने शुक्रवारीच अंतर्गत नवा आदेश काढत निर्बंध कठोर केले आहेत. निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथीलता देणाऱ्या लेव्हल १ आणि लेव्हल २ रद्द करण्यात आल्या असून आता सपूर्ण राज्यात लेव्हल ३ आणि त्यापुढील लेव्हलनुसारच निर्बंध राहणार आहेत. या नव्या आदेशानंतर स्थानिक पातळीवर प्रशासनाने पावले टाकायला सुरुवात केली आहेत. जिथे निर्बंध शिथील करण्यात आले होते तिथे नव्याने निर्बंध लादण्याबाबत आदेश जारी करण्यात येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर करोना संसर्गाची आजची स्थिती हाती आली असून नवीन बाधितांची संख्या अपेक्षित प्रमाणात कमी होत नसल्याचेच त्यात दिसत आहे.
वाचा:
राज्यातील आजची करोना स्थिती
– आज १७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– सध्या राज्यातील २.० टक्के एवढा.
– राज्यात २४ तासांत ९ हजार ८१२ नवीन रुग्णांचे निदान.
– दिवसभरात ८ हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी
– आजपर्यंत एकूण ५७,८१,५५१ रुग्णांची करोनावर मात.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.९३ टक्क्यांवर.
– करोनाच्या आतापर्यंत ४,०८,३१,३३२ चाचण्या पूर्ण.
– एकूण नमुन्यांपैकी ६०,२६,८४७ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
– सध्या करोनाचे १ लाख २१ हजार २५१ ॲक्टिव्ह रुग्ण
– जिल्ह्यात १७ हजार ३६०, ठाणे जिल्ह्यात १६ हजार २६० तर महापालिका क्षेत्रात १३ हजार ९४३ अॅक्टिव्ह रुग्ण.
– सध्या राज्यात ६,२८,२९९ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये तर ४,२७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times