श्रीनगरः जम्मूतील विमानतळावर मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. तांत्रिक विभागात हा स्फोट झाल्याचं समजतंय. स्फोट झाल्याची माहिती मिळताच बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी पोहोचलं आहे.
जम्मू विमानतळावर एअरफोर्स स्टेशनवर स्फोटाचे आवाज ऐकू आल्यानं परिसरात भीतीचे वातावरण पसरलं होतं. जम्मू विमानतळावर असलेल्या एअरफोर्स स्टेशनमध्ये स्फोटाचा आवाज ऐकू आला. हा परिसर उच्च सुरक्षा अंतर्गत येतो. ५ मिनिटांच्या फरकानं येथे दोन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवर झाला तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला. हा स्फोट भारतीय हवाई दलाकडून पूर्ण कामकाज चालवत असलेल्या भागात झाला आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
वाचाः
हवाई दल स्टेशनवर हा स्फोट झाला असून या स्फोटात २ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अद्याप हवाई दलाकडून सविस्तर माहिती समजू शकली नाहीये.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times