सुश्मिता सेननं नुकत्याच घेतलेल्या या लाइव्ह सेशनमध्ये तिची मुलगी अलिशा चाहत्यांच्या कमेंट वाचत होती. ज्यात एका चाहत्यानं सुश्मिताला, ‘तू माझ्याशी लग्न करशील का?’ असं म्हणत प्रपोज केलं. चाहत्याच्या या प्रपोजलवर सुश्मिता काही बोलते न बोलते तोच तिचा बॉयफ्रेंड रोहमन पुढे येऊन म्हणाला, ‘नाही’ रोहमनची अशी प्रतिक्रिया पाहून स्वतः सुश्मितालाही हसू आवरणं कठीण झालं.
रोहमनच्या अशा प्रतिक्रियेवर ‘हा प्रश्न तुझ्यासाठी नव्हता.’ असं आलिशा त्याला म्हणते. ज्यावर रोहमन तिला, ‘मी सुश्मिताच्या वतीनं याचं उत्तर दिलं’ असं म्हणताना दिसतो. पण तरीही अलिशा सुश्मितानंच याचं उत्तर द्यावं असं म्हणते आणि सुश्मिताही मुलीचं बोलणं ऐकून उत्तर देते. ती म्हणते, ‘रोहमननं लगेचच उत्तर दिलं की नाही.’ हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना सुश्मितानं लिहिलं, ‘तुमच्यामुळे नेहमीच माझा दिवस आनंदी जातो. मी तुमच्यावर खूप प्रेम करते.’
रोहमन आणि सुश्मिता मागच्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघंही सोशल मीडियावर नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सुश्मिताच्या कामाबद्दल बोलायचं तर मागच्या वर्षी रिलीज झालेली तिची वेब सीरिज आर्या बरीच गाजली. सध्या सुश्मिता या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनची तयारी करत आहे. या वेब सीरिजसाठी सुश्मितानं अनेक पुरस्कारही जिंकले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times