अमरावती: जिल्ह्यातील पोलिस स्टेशन अंतर्गत येणारया राष्ट्रीय महामार्गावर एका वाईन बार परिसरात शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुखाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. तिवासा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आशीर्वाद वाईन बारसमोर रात्री ५ जणांनी शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून ही हत्या केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ( brutally murdered in of )

तिवसा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका बारच्या बाहेर उभे असलेले शिवसेना शहर प्रमुख अमोल पाटील (वय ३४) यांच्या डोळ्यात हल्लेखोरांनी मिरची पूड फेकली आणि त्यानंतर त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ल्यात पाटील यांचा मृत्यू झाला. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार अमोल पाटील हे मित्रांसोबत बारमध्ये आले होते. मात्र बार बंद झाल्याने अमोल पाटील व त्याचा एक मित्र बारसमोर बसले होते. बारसमोर दारू पित असल्याची संधी साधून ५ आरोपींनी अमोल पाटील यांच्या हल्ला चढवला. डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्यांना जागीच ठार केले.

क्लिक करा आणि वाचा-
या घटनेची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली. तर १ आरोपी फरार आहे. धक्कादायक म्हणजे, अमोल पाटील याच्यावर याआधी दोन हत्या केल्याचा आरोप होता. त्याला दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता. ही हत्या अवैध धंद्यातून झाली असल्याची चर्चा आहे.

क्लिक करा आणि वाचा-
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा ही हत्या झाल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here