मुंबईः संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी साधायचा हे ज्याला कळते तो खरा नेता. केवळ आदळआपट करणे याला मी नेतृत्व म्हणत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावल्यानंतर आमदार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं शनिवारी सकाळी राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं. हे आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. भाजपनं हाच धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

ओबीसी व मराठा आरक्षणासाठी आंदोलन म्हणजे आदळआपट असं हिनवणे म्हणजे दोन्ही समाजांची चेष्टा करण्यासारखं आहे. संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?, असा सवाल भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत आपण बैठक घेतली. न्याय्यहक्कासाठी रस्त्यावर उतरणे हे आमच्या धमन्यांत भिनले आहे. संघर्षाच्या वेळी जरूर संघर्ष केला पाहिजे. पण, जेव्हा आपल्या लक्षात येते की सगळे एकमताचे आहेत तेव्हा संघर्ष थांबवून संवाद सुरू केला पाहिजे. तो संवाद संभाजीराजेंनी सुरू केला. पण अनेकजण अजूनही आदळआपट करतात,’ असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी एकीकडे संभाजीराजे छत्रपती यांचे कौतुक केले, तर दुसरीकडे अप्रत्यक्षरित्या भाजपच्या चक्का जाम आंदोलनावर टीका केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here