मुंबई: माजी गृहमंत्री यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने () कारवाई सुरू केली आहे. या वरुन शिवसेनेचे यांनी केंद्रावर टीकेचे प्रहार केले आहेत. राज्यातील तपास यंत्रणा सक्षम असताना देखील केंद्रीय यंत्रणा मागच्या दाराने आणल्या जात आहेत, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. जर केंद्रीय पथके कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई करत असतील तर हा प्रकार संघराज्य व्यवस्थेला अत्यंत हानीकारक आहे असेही राऊत म्हणाले. (mp sanjay raut has criticized the center over the action against )

खासदार संजय राऊत मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. हा प्रश्न दबावाचा नाही, तर ही कारवाई चुकीच्या पद्धतीने केली जात असण्याचा आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी विनाकारण त्रास दिला जात आहे याचा उल्लेख आहे आणि हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. या तक्रारींचा तपास या राज्याचे पोलीस, तसेच इतरही तपास यंत्रणा निष्पक्षपणे करु शकतात. यासाठी न्यायालये देखील आहेत. तरीदेखील मागच्या दाराने केंद्रीय तपास यंत्रणा आणल्या जात आहे. सत्ता गेल्यामुळे निराशा आणि वैफल्यातून अशा चौकशांचा ससेमिरा मागे लावला जात आहे, असे शरद पवार म्हणतात आणि ते बरोबर आहे, असे असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

ब्रिटिश राजवटीशी केली ईडीची तुलना

खासदार संजय यांनी या कारवाईबाबत बोलत असताना सक्तवसुली संचालनालयाची तुलना ब्रिटिश राजवटीशी केली आहे. महाविकासा आघाडीचे घटक पक्षांमधील काही लोकांवर ठरवून कारवाई केली जात आहे. मात्र, त्यांचे जे गुन्हे सांगितले जात आहेत, त्यांचा तपास करण्यासाठी राज्यातील तपास यंत्रणा सक्षम आहेत. मात्र, यासाठी केंद्रीय पथके कारवाई करत आहेत, असे सांगतानाच मात्र ही पथके कोणाच्या तरी दबावाखाली कारवाई करत आहेत आणि हे भारतीय संघराज्य व्यवस्थेला हानीकारक आहे, असे राऊत म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

केंद्राच्या लसीकरण मोहीमेचे केले स्वागत

यावेळी संजय राऊत यांनी केंद्रातील लसीकरण मोहीमेवर भाष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वर्षाच्या अखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. जर पंतप्रधानांनी ही मोहीम वर्षाअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांचे स्वागत करतो, असे राऊत यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here