खासदार संजय राऊत आज (रविवारी) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मला चांगलेच आठवतेय की आपण धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ असे फडणवीस यांनी पूर्वी म्हटले होते, असे सांगत फडणवीस आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचे राऊत यांनी अधोरेखित केले. कोरोनाचे संकट असतानाही ओबीसी आरक्षणासाठी भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करत असल्याचे सांगत त्यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, असेही राऊत पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
फडणवीसांवर टीका करताना संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर देखील निशाणा साधला. विरोधी पक्षाने जबाबदारीने वागले पाहिजे आणि ही जनतेची अपेक्षा आहे. पण जर ती जबाबदारी पाळत नसाल तर याचा अर्थ आपण जनतेला ज्ञान देण्यात अपुरे पडत आहोत. याचा अर्थ आपल्यात कमतरता आहेत. या कारवाया चुकीच्या पद्धतीने होत आहेत. सत्ता गेल्यावर त्यांना निराशा आली आहे आहे. याच नैराश्यातून आणि वैफल्यग्रस्ततेतून अशा प्रकारच्या चौकश्या सुरू करण्यात आल्या आहेत, असे सागतानाच सत्ताधारी पक्षातल्या प्रमुख नेत्यांवर ठरवून कारवाई केली जात असल्याचा थेट आरोप राऊत यांनी केला आहे. केंद्रीय पथके दबावाखाली येथे येऊन कार्यवाही करतात आणि हे भारताच्या संघराज्य पद्धतीला हानीकारक आहे, असेही ते पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times