जम्मूः जम्मूतील हवाई दलाच्या तळा रविवारी पहाटेच्या सुमारास दोन कमी तीव्रतेचे ( ) स्फोट झाले. हा दहशतवादी हल्ला ( ) असल्याचं जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह ( ) यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी हवाई दल आणि इतर तपास यंत्रणाकरून तपास सुरू असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, या घटनेनंतर पंजाबमधील पठाणकोट इथल्या हवाई दलाच्या तळावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मूत हवाई दलाच्या तळावर झालेला हल्ला हा ड्रोनने करण्यात आल्या असून हे ड्रोन पाकिस्तानातून आल्याचं गुप्तचर संस्थांनी सांगितलं आहे.

जम्मूतील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी पोलिस आणि इतर तपास संस्था या हवाई दलाच्यासोबत संयुक्तपणे काम करत आहेत. हल्ला कोणी केला आणि हल्ल्या मागे कोण होतं? याचा तपास केला जात आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) पथक घटनास्थळी दाखल झाले आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली.

हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जम्मूत देशद्रोह कायद्यांतर्गत (UAPA)गुन्हा दाखल झाला आहे. हवाई दलाच्या तळावर दोन स्फोट घडवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितलं. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here