म.टा. प्रतिनिधी,

अहमदनगरच्या महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र येणार, शिवसेनेचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौर असं वरिष्ठांसमोर ठलल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरच्या राजकारणात शेवटपर्यंत काहाही घडू शकतं, असं वक्तव्य करून नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. आमच्याकडे महापौरपदासाठी उमेदवार नसला तरी वरिष्ठांनी निर्णय घेतला तर आम्ही विकासाच्या मुद्द्यावर कोणासोबतही जाऊ शकतो, असे म्हणत विखे यांनी नव्या समीकराणांचीही शक्यता व्यक्त केली. (anything can happen in the says )

महापौरपदासाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने भाजप या निवडणुकीतून बाहेर पडल्याने शिवसेना व राष्ट्रवादीला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. तर दुसरीकडे शिवसेना व भाजप पुन्हा एकत्र येण्याचा पर्यायही खुला झाला आहे. अशाही परिस्थितीत भाजपच किंगमेकर ठरेल, असे वरिष्ठ नेते सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर विखे यांनी केलेले वक्तव्य उमेदवार नसलेल्या भाजपला पुन्हा चर्चे आणणारे ठरले आहे.

क्लिक करा आणि वाचा-
सध्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर आहेत. त्यांची मुदत ३० जूनला संपत आहे. त्याच दिवशी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी रविवारी विखे यांच्या उपस्थिती महापौरपदाच्या काळात शहरात केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर डॉ. विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विखे म्हणाले, ‘यावेळी अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातील उमेदवार भाजपकडे नाही. त्यामुळे या पदावर आमचा दावा असू शकत नाही. आमच्याकडे उमेदवार नसल्याने आम्ही विरोधी पक्षात राहणार आहोत, ही आजची परिस्थिती आहे. मात्र, नगरचा इतिहास पाहता, निवडणूक होईपर्यंत पुढचे आत्ताच काही सांगता येत नाही.’

क्लिक करा आणि वाचा-
असे असले तरी यासाठी कोणासोबत जायचे, याचा वरिष्ठ पातळीवर निर्णय होऊ शकतो. त्याची आम्ही स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करू. शिवसेनेचे नगरसेवक मुंबईत आपल्याला भेटले होते, ही वस्तुस्थिती आहे, मात्र ते त्यांच्या कामासाठी आले होते व मी माझ्या कामाला गेलो होतो. अहमदनगरला एकदा आमची भेट झाली होती. त्यावेळेला आमच्याशी महापौर पदाबाबत त्यांनी चर्चाही केली होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडी असल्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षाचा निर्णय झाल्यानंतर त्यावर बोलणे उचित होईल, असे मी त्यांना सांगितले होते. असेही विखे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
नगरमध्ये काम करताना सर्वच पक्षांचे सहकार्य लाभल्याचे विखे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘खासदार म्हणून मी नवीन होतो. मात्र, येथील नागरिकांना मला लवकर स्वीकारले. काम करण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळाले. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व मी लोकसभेची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढविली. मात्र, पुढे आमदार झाल्यावर शहराच्या कामासंबंधी आमच्यात उत्तम संवाद राहिला. सर्वच पक्षांनी मिळून काम केले तर नगरच् विकासासाठी कोणाकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही,’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here