राहुल द्रविडने नेमकं काय सांगितलं, पाहा…या दौऱ्याबाबत द्रविड म्हणाला की, ” श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, काही खेळाडूंनी अजूनपर्यंत भारताकडून एकही सामना खेळलेला नाही. पण हा दौरा खुल छोटा आहे, कारण या दौऱ्यात जास्त सामने नाहीत. त्यामुळे या दौऱ्यात संघातील सर्व खेळाडूंना संधी मिळेल, असे वाटत नाही. माझ्यामते अशी आशा करणे अवास्तविक असेल. कारण या दौऱ्यात सहा सामने आहेत आणि या सामन्यांमध्ये प्रत्येक खेळाडूला संधी देणे शक्य वाटत नाही. संघाचा योग्य समतोल राखून आम्हाला संघ निवडावा लागणार आहे. भारताचा सर्वोत्तम संघ आम्ही निवडण्याचा प्रयत्न करू आणि हा दौरा जिंकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”
श्रीलंकेतील सामने कधी आणि किती वाजता सुरु होणार, पाहा…श्रीलंकेत यावेळी वनडे सामने दुपारी २.३० वाजल्यापासून सुरु होतील, तर ट्वेन्टी-२० सामेन रात्री सात वाजता सुरु होतील. भारताचा पहिला वनडे सामना हा १३ जुलैला होणार आहे, त्यानतंर दुसरा वनडे सामना १६ जुलैला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील अखेरचा आणि तिसरा वनडे सामना १८ जुलैला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेला २१ जुलैला सुरुवात होणार आहे. या दिवशी दोन्ही संघांत पहिला ट्वेन्टी-२० सामना खेळवला जाणार आहे, त्यानंतर दुसरा ट्वेन्टी-२० सामना हा २३ जुलैला खेळवण्यात येणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना हा २५ जुलैला खेळवला जाईल. हे सर्व सामना कोलंबोतील प्रमदासा स्टेडियमवर होणार आहेत. शिखर धवनकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times