नवी दिल्ली : क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. क्रिकेट विश्वात सिक्सर किंग या नावाने ओळखला जाणारा भारताचा युवराज पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. एका महत्वाच्या स्पर्धेत युवराज सिंगबरोबर ख्रिस गेल खेळणार असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

युवराजने २०१९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पण त्यानंतरही युवराजची क्रेझ कमी झालेली नाही. युवराजला क्रिकेट खेळताना पाहण्यासाठी अजूनही चाहते आसूसलेले आहेत. त्यामुळे चाहत्यांसाठी युवराज पुन्हा एकदा मैदानात उतरणार असल्याचे आता समोर आले आहे.

युवराज ऑस्ट्रेलियातील एका ट्वेन्टी-२ स्पर्धेत खेळणार आहे. युवराजबरोबर ख्रिस गेल, श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशानही या स्पर्धेत खेळणार आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजला महान क्रिकेटपटू ब्रायन लारा आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डी व्हिलियर्सही आता या स्पर्धेत खेळू शकतो, असे आयोजकांनी सांगितले आहे. पण त्यांच्याकडून अजून पूर्णपणे सहमीत मिळालेली नाही.

ऑस्ट्रेलियातील मुलग्रेव्ह क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मिलन यांनी यावेळी सांगितले की, ” ट्वेन्टी-२० स्पर्धेत आता ख्रिस गेल खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्याचबरोबर श्रीलंकेचे दिलशान, थरंगा आणि सनथही या स्पर्धेत खेळणार आहे. या स्पर्धेसाठी युवराज सिंगबरोबरही आमचे बोलणे सुरु आहे आणि त्याच्याकडून आम्हाला ९० टक्के होकार आलेला आहे. त्यामुळे या लीगमध्ये आता एकाापेक्षा एक दिग्गज खेळाडू पाहायला मिळतील.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here