मुंबई लोकलची दारे सर्वसामान्यांसाठी बंद असली तरीही बोगस ओळखपत्र तयार करुन प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळं लोकलमधील गर्दीचे प्रमाण वाढले आहे. ही गर्दी टाळण्यासाठी सरकारने क्यूआर कोड असलेल्या पासची सिस्टिम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास असं या सिस्टिमचं नाव असून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच क्युआर कोडचा पास दिला जाणार आहे.
वाचाः
क्युआर कोड असलेले युनिवर्सल आयकार्ड अत्यावशक सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. कर्मचाऱ्यांकडे हे ओळखपत्र असेल तरच त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश मिळणार आहे. तसंच, क्युआर कोड असलेले पास स्मार्टफोन किंवा क्युआर रिडर मशीनद्वारे तपासण्यात येणार आहेत. त्यामुळं ते पास बनावट आहेत का हे ओळखण्यास मदत होणार आहे. क्युआर कोड सिस्टिममुळं बोगस ओळखपत्रावरुन प्रवास करणाऱ्यांना चाप बसणार आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्युआर कोड असलेला पास मिळाला की रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवरुन त्यांना पास व तिकीट मिळू शकते. याबाबतीत राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेच्या महासंचालकांना पत्र दिलं आहे. मात्र, क्यु-आर कोड सिस्टिम कधीपर्यंत लागू होईल याबाबत अद्याप माहिती समोर आली नाहीये.
वाचाः
कसा मिळवायचा पास
युनिव्हर्सल ट्र्रॅव्हल पास मिळवण्यासाठी सरकारने खास वेबसाईट तयार केली आहे. लोकल प्रवासासाठी पात्र असलेल्या व्यक्तीला या वेबसाईटच्या माध्यमातून पास मिळवता येणार आहे.
पास मिळवण्यासाठी वेबसाईट- https://epassmsdma.mahait.org/
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times