माझ्या हाती सत्तेची सूत्रे आली तर चार महिन्यांत ओबीसी आरक्षण देईन आणि देता आले नाही तर राजकीय संन्यास घेईन,’ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केलेल्या चक्काजाम आंदोलनावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया समोर येत होत्या. शिवसेनेनंही यावर भाष्य केलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसनंही आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडवीसांच्या या वक्तव्याला फारसे गांभीर्य देण्याची गरज नसल्याचं अप्रत्यक्षरित्या सुचवलं आहे.
वाचाः
‘देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू असं, धनगर समाजाला सांगितलं होतं. पण पहिल्या बैठकीतही नाही व पाच वर्षातही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. ते फक्त दिशाभूल करत गेले, अशी टीका थोरात यांनी केली आहे. सत्तेसाठी वारेमाप बोलायचं व वाट्टेल ते आश्वासन द्यायचं नंतर मात्र ते कृतीतून करायचं नाही, असा अनुभव भाजपचा आपल्याला आधीपासूनच आहेच. जनमाणसाला फसवणं आणि सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात,’ असंही थोरात यांनी म्हटलं आहे.
वाचाः
संजय राऊत काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारची विरक्तीची भाषा करणं योग्य नाही. आम्ही तसं होऊ देणार नाही. उत्तम नेतृत्व देऊ शकणाऱ्या नेत्यांची देशात आणि राज्यात कमतरता आहे. फडणवीस हे चांगल्या नेत्यांपैकी एक आहेत. लढवय्ये आहेत. ते त्यांच्या मुद्द्यासाठी लढत राहतील. त्यांनी संन्यास घेतला तर भाजपचं आणि जनतेचंही मोठं नुकसान होईल. त्यामुळं त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचं मन वळवायला हवं. आम्ही स्वत: त्यांची भेट घेऊ. मन वळवण्याचा प्रयत्न करू, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times