कोल्हापूर: उथळपणाने अपरिपक्व व प्रसिद्धीसाठी बालिश कृत्ये करणाऱ्यांना विनाकारण महत्व देऊ नका. परमेश्वरी कृपेने आपण यशोशिखरावर आहोत. जनतेची सेवा करूया, असा संदेश यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

मंत्री मुश्रीफ यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे, मुरगूड शहरवासियांना व माता-भगिनींना पाण्यासाठी दाही दिशा फरपट करायला लावणाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती दिवशीच राधानगरी धरणावर जाऊन तेथील पवित्र भूमी कलंकित करू नये, असे पत्रक मुरगुडच्या कार्यकर्त्यांनी काढले होते. मग स्वतःचा स्वार्थ जेथे असेल तेथे चकार शब्दही बोलत नाहीत.

पत्रकात पुढे म्हटले आहे, जिल्हा करोना परिस्थितीमध्ये चौथ्या लेव्हलवर असल्यामुळे सर्वच कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे; परवानगी मागितली तरी शासकीय अधिकारी परवानगी देणारच नाहीत. अशी परवानगी दिली तर त्यांच्या नोकऱ्या जातील, हे माहीत असल्यामुळे मुद्दाम परवानगी मागायची. परवानगी मिळणार नाही, हे माहित असल्यामुळे स्टंटबाजी करायची. त्यानंतर ही परवानगी कोणाच्यातरी सांगण्यावरून दिली नाही, अशीच सहानुभूती मिळवायची. त्यातून प्रसिद्धी मिळवायची, अशा बालिश बुद्धीच्या सल्लागारांचा सल्ला ऐकून अशी कृती करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. बेशक धरणावर जाऊन मुक्काम करू देत, त्याची काळजी करू नका.

क्लीक करा आणि वाचा-

पत्रकात पुढे म्हटले आहे, परमेश्वराने आपल्याला फार मोठी संधी दिलेली आहे. या काळामध्ये आपण जनतेची सेवा करू. त्यांच्या संकटामध्ये धावून जवून त्यांना दिलासा देऊया. कोरोना काळामध्ये जनतेच्या सुख- दुःखामध्ये सामील होऊया. विकासकामे करण्याची तर अशी संधी सुवर्णसंधी आली आहे, की गावागावातील विकासकामे अशी करूया की जनता शंभर वर्षे आपले नाव काढेल. परमेश्वराने आपल्याला एवढ्या मोठ्या यशोशिखरावर पोहोचवले आहे की अतिशय विनयाने जनतेला विश्वास देऊया. जनतेने नाकारलेल्याना दुसरे कोणतेही काम राहिलेले नाही. त्यामुळेच, उथळपणाने बालिश व अपरिपक्व कृती केल्या जात आहेत. ही सगळी कृती प्रसिद्धीसाठी असून तिकडे अजिबात लक्ष देऊ नका. आपला वेळ वाया घालवू नका.

क्लिक करा आणि वाचा-
पत्रकात म्हटले आहे, नशीब! आंबेओहळ प्रकल्पाच्या पाण्याचे पूजन झाले नाही; फक्त वंदनच केले गेले. हायकोर्टामध्ये धरणाचे काम थांबवणारे, घळभरणी करू नये असा प्रयत्न करणारे, प्रकल्पग्रस्तांना विनाकारण उचकवून उत्तूर विभागासह कडगाव -गिजवणे विभागातील लोकांना वंचित ठेवणाऱ्यांना त्या भागातील जनता चांगलेच ओळखून आहे. लवकरच धरण पूर्ण भरेल व सर्व कार्यकर्त्यांसोबत त्या पाण्याचे दर्शन लवकरच घेऊ. तसेच, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पाण्याचे पूजन करण्याचा कार्यक्रमही संपन्न करू.

क्लिक करा आणि वाचा-
मुरगूडच्या कार्यकर्त्यांनी राधानगरीच्या धरणावर गोमूत्र शिंपडून ती भूमी पवित्र करणार असल्याचा इशारा पथकाद्वारे दिलेला आहे. याचा संदर्भ घेत मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे, राधानगरी धरणावर गोमूत्र वगैरे शिंपडणे असल्या गोष्टी करून त्यांना प्रसिद्धीसाठी वाव देऊ नका. जे कोणी असा प्रकार करतील, ते माझे कार्यकर्ते असणार नाहीत, असा दमही मुश्रीफ यांनी दिला आहे. जनता सर्व ओळखून असते. जनता फार हुशार आहे, म्हणूनच २५ वर्षे आपण सत्तेत आहोत. त्यांचा आदर करूया.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here