अधिक माहितीनुसार, महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रशासन अलर्ट झाले असून महाराष्ट्रातून गोवा राज्यात प्रवेश करणाऱ्या चार सीमा बंद करण्यात आल्या आहेत. गोवा राज्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य असून त्याची चाचणी नसेल त्याची चाचणी नाममात्र शुल्क लावून केली जात आहे.
डेल्टा प्लस विषाणू व्हायरसचा गोवा राज्यात प्रादुर्भाव वाढू नये या करिता गोवा राज्य सतर्क झाले असून गोवा महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरून गोवा पत्रादेवी येथे तपासणी सुरू झाली आहे. यामुळे नागरिकांनी प्रवास करताना कोरोनाच्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. अन्याथा तुम्हाला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
दरम्यान, राज्यात मॉल आणि थिएटर अद्याप बंद आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने शनिवारी व रविवारी बंद राहतील. सायंकाळी 4 पर्यंत जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, हॉटेल्ससुद्धा 50 टक्के क्षमतेसह सुरू होतील. पर्यटन आणि तीर्थक्षेत्रांवरही बंदी लागू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त 50 लोकांना विवाह सोहळ्यासाठी आणि जास्तीत जास्त 20 लोकांना अंत्यसंस्कारासाठी परवानगी आहे. स्टुडिओच्या बाहेर चित्रपटांचे चित्रीकरण केले जाणार नाही. मुंबई लोकल सामान्य प्रवाश्यांसाठी बंद राहील.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times