श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील पुलवामाच्या येथे सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. या दहशतवाद्यांची ओळख पटली असून जांगीर रफीक वानी, राजा उमर मकबूल आणि उजैर अमीन भट अशी या ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

त्राल भागातील मेंधार सेक्टरमध्ये ही चकमक झाली. भारतीय लष्कर, केंद्रीय राखील पोलिस दल (सीआरपीएफ) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली होती. पुलवामा जिल्हयात त्राल येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराच्या हाती आल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी ही संयुक्त शोध मोहीम हाती घेण्यात आली. दहशतवादी लपून बसले होते त्या भागाला सुरक्षा दलाने घेरल्यानंतर ही चकमक सुरू झाली.

या चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांचे मृतदेह हाती आल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांचे महासंचालक विजय कुमार यांनी दिली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळाही हस्तगत करण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here