सांगलीः ड्रॅगन फ्रुटची मागणी सध्या बाजारात वाढली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील ड्रॅगन फ्रुटची मागणी वाढल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेले आता थेट दुबईला निर्यात होणार आहे.

सांगली जिल्ह्यातील ताडासर या गावात ड्रॅगन फ्रुटची शेती केली आहे. भारत सरकारच्या संस्थेच्या एपीएडीएनं मान्यता दिलेल्या निर्यातकाला मेसर्स केबीनं ड्रॅगन फ्रुट दुबईला पाठवले आहेत. ‘ड्रॅगन फळाची चव साधारण किवी फळासारखी असते. आंबट, खारट आणि थोडेसे चवीने गोड असलेले हे फळ प्रामुख्याने परदेशात मोठ्या प्रमाणात उत्पादित होते. अमेरिका, थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंकासारख्या देशात त्याचे उत्पादन होते. खास उष्णप्रदेशीय देशात त्याचे उत्पादन घेण्यात येते. गेल्या तीन-चार वर्षांत शेतकऱ्यांचे हे पीक घेण्याकडे ओढा वाढला असून आता भारतातही ड्रॅगन फळाची शेती करण्यात येत आहे.

वाचाः

पहिल्यांदाच केली निर्यात
भारतातून पहिल्यांदाच ड्रॅगन फ्रुटची निर्यात दुबईत झाली आहे. भारतात सन १९९० पासून ड्रॅगन फ्रुटची शेती करण्यास सुरुवात झाली. पूर्वी लोक फक्त गार्डनमध्ये याचं पिक घेत होते. मात्र, इतर देशात ड्रॅगन फ्रुटची मागणी वाढल्यानं इतर राज्यातील शेतकऱ्यांनीही हा पॅटर्न आपल्या शेतात राबवला आहे.

वाचाः

ड्रॅगन फ्रुटच्या तीन प्रजाती
भारतात सध्या कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि अंदमान या राज्यात ड्रॅगन फ्रुटची शेती करण्यात येते. या फळासाठी पाण्याचा वापर कमी केला जातो. तसंच, विविध प्रकारच्या मातीतही या फळाची लागवड केली जाऊ शकते. याच्या प्रमुख तीन प्रजाती आहेत. ज्यामध्ये सफेद गर आणि गुलाबी साल, लाल गर आणि गुलाबी साल आणि सफेद गर आणि पिवळी साल हे त्याचे प्रमुख प्रकार आहेत. या फळात तंतुमय पदार्थ, जीवनसत्व, खनिजे, अँटी ऑक्सिडंट असतात. अँटी ऑक्सिडंटमुळं पेशींचे झालेले नुकसान भरुन निघते. पचन व्यवस्था सुधारते. कमळाच्या पाकळ्यासारख्या दिसत असल्यानं या फळाला कमलम असंही म्हणतात.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here