मित्रमंडळींना माहिती म्हणून किंवा कधी तरी इम्प्रेशन मारण्यासाठी व्हॉट्सअॅपवरील डीपी आणि स्टेटस () अनेक जण बदलत असतात. त्यावर चित्रविचित्र फोटो ठेवत असतात. असे स्टेटस ठेवताना जपून राहण्याची गरज आहे. कारण, हातात शस्त्र घेऊन व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवणं पुण्यातील एका व्यक्तीच्या अंगलट आलं आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला आहे.
वाचा:
अनिकेत साठे (रा. आंबेडकरनगर, चंदननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय शस्त्रास्त्र कायदानुसार, चंदननगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे हवालदार दीपक भुजबळ यांना याविषयी माहिती मिळाली होती. चंदननगर परिसरात राहणारा अनिकेत साठे याने हातामध्ये शस्त्र घेऊन उभा असल्याचे स्टेटस व्हॉट्सअॅपवर ठेवले आहे. तो चंदननगर येथील पाण्याच्या टाकीजवळ थांबला आहे. त्याच्याकडे शस्त्र आहे. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने सापळा रचून साठे याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे कोयता आढळून आला. त्याला अटक करून चंदननगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times