भाजपचे मुख्य प्रवक्ते यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी उपाध्ये यांनी राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजात असंतोष आहे. त्याच प्रमाणे या सरकारला ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकवण्यात आलेले नाही. राज्य सरकारला धोरणच नसल्याने तरूणासमोर बेकारीचे संकट निर्माण झाले आहे. अशी स्थिती असल्यामुळे राज्य सरकारविरोधात राज्यातील सर्वच घटकांमध्ये मोठा असंतोष आहे, असे उपाध्ये म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
रविवारी सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ आजच्या महाराष्ट्राच्या जनतेत आलेल्या वैफल्याचे प्रतिनिधीत्व करणारा आहे. या सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. तसेच रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले आहेत, छोटे व्यावसायिक आणि व्यापारी वर्गाचेही असेच प्रश्न निर्माण झाले आहेत. यामुळे जनता संतप्त झाली असून जनतेला तोंड देण्याचे धाडस आता या सरकारमध्ये नाही. त्यामुळे हे सरकार पळपूटेपणाचा मार्ग अवलंबत तिसऱ्या लाटेची दहशत पसरवत आहे, असे टीकास्त्र उपाध्ये यांनी सोडले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
लोकांना घरी बसवण्याचा प्रयत्न
सरकारने राज्यात पुन्हा निर्बंध लादणे सुरू केले असून लोकांना घरी बसवून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. दुसरी लाट, तिसरी लाट अशी भिती जनतेच्या मनात निर्माण करण्याचे काम केले जात आहे, असा आरोप करतानाच जनतेने जगायचे कसे, असा प्रश्न उपाध्ये यांनी उपस्थित केला आह. हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणताही प्रयत्न सरकारकडून केला जात नाही. राज्य सरकारने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवत नव्याने निर्बंध लागू केले आहेत. सरकार राज्यात सतत लॉकडाऊन करत आहे. मात्र तरीही सर्वात जास्त रूग्ण राज्यात आहेत. त्याच प्रमाणे मृत्यूहही महाराष्ट्रातच आहेत. प्रभावी उपाययोजनांचा अभावात देखील महाराष्ट्राचाच क्रमांक पहिला लागतो. राज्यासमोरचे हे प्रश्न पाहता जनतेमध्ये सरकारबाबत मोठा रोष आहे. जनता संतापलेली आहे. अशा जनतेला तोंड द्यायला लागू नये म्हणूनच सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत, असे उपाध्ये म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times