कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या व उपाध्यक्षपदाच्या निवडी या बारा जुलै रोजी होणार आहेत. यांनी सोमवारी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. राजर्षी शाहू सभागृह येथे सकाळी ११ वाजता विशेष सभा होणार आहे. ( president and vice president announced)
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, सतीश पाटील यांच्यासह सर्व सभापतींनी राजीनामा दिल्याने सध्या सर्व पदे रिक्त आहेत. यातील अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी बारा जुलैला विशेष सभा होणार आहे.
यामुळे उपाध्यक्ष व अन्य सभापतिपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे जिल्हा परिषदेतील घडामोडींना गती आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि सभापतिपदासाठी इच्छुक सदस्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला तीन पदे मिळण्याची शक्यता आहे.
क्लिक करा आणि वाचा-
अध्यक्षपदावर दोन्ही काँग्रेसने दावा केला आहे. यावरुन महाविकास आघाडी अंतर्गत धुसफूस सुरू आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार आता अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याचे म्हटले आहे. तर काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी अध्यक्षपदासाठी काँग्रेसचा दावा कायम ठेवला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी सरिता शशिकांत खोत, राहूल पाटील, भगवान पाटील, पांडूरंग भादिंगरे अशी नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीला हे पद दिल्यास युवराज पाटील यांच्या गळ्यात ही माळ पडण्याची चिन्हे आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
बांधकाम समिती सभापतिपदासाठी वंदना जाधव, समाजकल्याण समिती सभापतिपदासाठी कोमल मिसाळ, मनीषा कुरणे यांची नावे चर्चेत आहेत. अपक्ष सदस्या रसिका पाटील यांचे पती अमर पाटील यांनीही पदासाठी प्रयत्नशील आहेत. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी शिवानी भोसले यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times