करोनाची तिसरी लाट कधी येणार याची निश्चित तारीख सांगणं योग्य नाही. व्हायरसचे वर्तन अनिश्चित आहे. एक अनुशासित आणि प्रभावी प्रक्रियाच ही संभाव्य लाट रोखता येऊ शकते. व्हायरसच्या कुठल्याही लाटेचा प्रसार हा अनेक पैलूंवर अवलंबून असतो. म्हणजे कोविडशी संबंधी शिस्त, चाचण्या आणि कंटेन्मेंट झोन बनवण्याचं धोरण आणि लसीकरणाचा वेग हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. याशिवाय व्हायरसचा अनिश्चित व्यवहारही महामारीची दशा-दिशा बदलू शकतो, असं पॉल म्हणाले.
करोनाची पुढील लाट ही आपल्या सर्वांच्या वर्तनावर अवलंबून आहे. यासाठी कुठली तारीख देणं योग्य ठरणार नाही. करोनाची दुसरी लाटे टिपेला असताना देशात रोज ४ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत होते. आता रोज ५० हजारापर्यंत रुग्ण आढळत आहेत. हळूहळू निर्बंध कमी केले जात आहेत. आपण सर्वांनी करोनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे केल्यास कुठल्याही लाटेला रोखू शकतो, असं निती आयोगाचे (आरोग्य) सदस्य असलेल्या डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केलं.
डेल्टा प्लस वेरियंट हा अधिक संसर्गजन्य आणि त्यावर लसी फारशा प्रभावी नाहीत, याचा कुठलाही पुरवा नाहीए. डेल्टा प्लस वेरियंट हा डेल्टाचे म्युटेशन आहे. या डेल्टा प्लस वेरियंट बाबत सध्या प्राथमिक माहिती आहे. हा वेरियंट अधिक संसर्गजन्य आहे? या वेरियंटने रुग्ण गंभीर होण्याचा धोका अधिक आहे का? किंवा लसींचा प्रभाव की होतो का? यासंदर्भात कुठलेही पुरावे नाहीत, असं डॉ. पॉल म्हणाले.
भारताच्या कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळण्याची प्रक्रिया उत्तम प्रकारे सुरू आहे. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. फायजर आणि मॉडर्नाच्या करोनावरील लसींनाही देशात लवकरच मंजुरी मिळेल असं डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times