मुंबई : कच्च्या तेलाच्या किमती दोन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर गेल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यावरील तेल आयातीचा खर्च प्रचंड वाढला आहे. तो कमी करण्यासाठी कंपन्यांकडून ग्राहकांना दरवाढीचा शॉक दिला जात आहे. आज मंगळवारी पुन्हा एकदा कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज पेट्रोल ३५ पैशांनी आणि डिझेल २८ पैशांनी महागले आहे. काल सोमवारी इंधन दर स्थिर होते.

गेल्या आठवड्यात जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव ७६ डॉलरवर गेला होता. पाश्चिमात्य देशांमधील इंधन मागणी कायम राहिल्यास या आठवड्यात देखील ही तेजी कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान सोमवारी तेलाच्या किमतीत घसरण पाहायला मिळावी. ब्रेंट क्रूडचा भाव १.७९ डॉलरने कमी झाला आणि तो ७४.५८ डॉलरवर स्थिरावला होता. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव देखील १.४४ डॉलरने कमी झाला आणि तो ७२.७७ डॉलर प्रती बॅरलपर्यंत खाली आला होता.

आज मंगळवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०४.९० रुपयांपर्यंत वाढला आहे. दिल्लीत पेट्रोल ९८.८१ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा ९९.८० रुपये इतका भाव वाढला आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९८.६४ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०७.०७ रुपये झाला आहे.

मुंबईत आजचा डिझेलचा भाव ९६.७२ रुपये आहे.दिल्लीत डिझेल ८९.१८ रुपये आहे. चेन्नईत ९३.७२ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.०३ रुपये प्रती लीटर आहे. भोपाळमध्ये डिझेलचा भाव ९७.९३ रुपये झाला आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे.

दरम्यान, कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलची किंमत स्थिर ठेवली होती. तर रविवारी पेट्रोल दरात ३५ पैसे आणि डिझेल दरात २४ पैसे वाढ करण्यात आली होती. तर शनिवारी पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ३५ पैशांनी महागले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here