नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्रपती यांचा भारत दौरा सुरू होण्यापूर्वी त्यावरून देशात राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेस पक्षाने ट्रम्प यांच्या स्वागतासाठी ७० लाख भारतीय उपस्थित राहणार असल्याच्या दाव्याबाबत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ७० लाख लोक स्वागतासाठी उभे राहण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे काय भगवान राम आहेत का?, असा संतप्त सवाल काँग्रेसचे नेते यांनी उपस्थित केला आहे. आपल्या स्वागतासाठी विमानतळ ते गुजरातमधील मोटेरा स्टेडियमपर्यंत ७० लाख लोक उपस्थित राहणार असल्याचे आपल्याला पंतप्रधान मोदी यांनी सांगितले असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्याबाबत बोलताना म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी ७० लाख इतक्या मोठ्या संख्येने भारतीय लोकांनी का म्हणून उपस्थिती दाखवावी असे काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत बोलताना म्हटले आहे. ट्रम्प हे ईश्वर नसून ते फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. मग त्यांच्या स्वागतासाठी ७० लाख लोकांनी उपस्थित राहण्याची काय आवश्यकता आहे, असा सवाल चौधरी यांनी लोकसभेत विचारला. आम्ही भारतीय लोक त्यांची पूजा करण्यासाठी उभे राहणार नाही, असेही चौधरी पुढे म्हणाले.

‘ट्रम्प आपल्या फायद्यासाठी भारतात येत आहेत’
डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या फायद्यासाठी भारतात येत आहेत. भारत दौऱ्यादरम्यान ते व्यापारी करार न करण्याच्या ट्रम्प यांच्या वक्तव्यावरही चौधरी यांनी टीकास्त्र सोडले आहे. ट्रम्प भारतात येत आहेत, मात्र ते व्यापारी करार करणार नाहीत. त्यांना अमेरिकी उद्योगांना संरक्षण हवे आहे. याचाच अर्थ ते आम्हाला अमेरिकेच्या बाजारात जाऊ देऊ इच्छित नाही. भारत विकसित झाला आहे याची ते घोषणा करत आहेत, असे चौधरी आपल्या भाषणात म्हणाले.

भारतात प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न हे २ हजार डॉलर्स इतके आहे, तर अमेरिकी नागरिकाचे उत्पन्न आहे ६० हजार डॉलर्स. असे असताना आम्ही विकसित देश कसे काय, असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला आहे. खरे म्हणजे ही ट्रम्प यांची अमेरिका फर्स्ट हे धोरण आहे. या अंतर्गत ते आपला धंदा चमकवू पाहत आहेत, अशी टीकाही त्यांनी ट्रम्प यांच्यावर केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here