मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांचं प्राणीप्रेम सर्वश्रुत आहे. राज यांच्याकडे वेगवेगळ्या प्रजातींचे सहा पाळीव श्वान आहेत. राज ठाकरेंच्या या पाळीव श्वानांपैकी एका श्वानाचे निधन झालं आहे. राज ठाकरेंच्या जेम्स या ग्रेट डेन जातीच्या श्वानाचे निधन झालं आहे.

राज ठाकरे यांच्या घरी विविध प्रजातींचे श्वान गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. यातील ठाकरे यांच्या आवडत्या ग्रेट डेन जातीच्या श्वानाचे काल रात्री १२च्या सुमारास निधन झाले. वयोमानानुसार जेम्सचे काल निधन झाले. गेले अनेक वर्ष जेम्स हा राज ठाकरेंच्या कुटुंबाचा एक सदस्य होता. जेम्सच्या निधनानंतर स्वतः राज ठाकरे व हे स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

वाचाः
राज ठाकरेंबरोबरच त्यांच्या कुटुंबियांनाही या श्वानांचा विषेश लळा आहे. आपल्याच घरातील एका सदस्याप्रमाणे ते त्यांची काळजी घेताना दिसतात. अनेकदा राज ठाकरेंचे त्यांच्या पाळीव श्वानांसोबतचे फोटोही व्हायरल झाले होते.

वाचाः
राज ठाकरे यांच्याकडे ग्रेट डेन या जातीचे तीन श्वान होते. त्यातील बॉण्ड या श्वानाचे याआधी २६ डिसेंबर २०१८ रोजी निधन झाले होते. बॉण्ड १२ वर्षांपासून राज ठाकरेंसोबत होता. काही वर्षांपूर्वी बॉण्डनेच राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंवर हल्ला केला होता. त्यानंतर त्याची रवानगी कर्जतच्या फार्महाऊसवर करण्यात आली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here