मुंबई: मुख्यमंत्री हे आज सकाळी रुग्णालयात पोहोचले. मात्र, मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम असून ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते, अशी माहिती आहे. तासाभराच्या तपासणीनंतर ते पुन्हा रुग्णालयातून घरी परतले. ()

एच एन रिलायन्स हे रुग्णालय मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाच्या जवळच आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरू होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत आज या रुग्णालयात पोहोचले. तिथं त्यांची नियमित तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री रुग्णालयात येणार असल्यानं आसपासच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वाचा:

उद्धव ठाकरे यांच्यावर २०१२ साली लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली आहे. नियमित आरोग्य तपासणीसाठी ते लिलावती रुग्णालयातच जातात. मात्र, मुख्यमंत्री झाल्यापासून अनेकदा ‘वर्षा’ निवासस्थानी त्यांचा मुक्काम असतो. त्यामुळं यावेळी त्यांनी रिलायन्स रुग्णालयात जाणं पसंत केलं. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत. राज्यात करोनाचे संकट आल्यापासून ते सतत कार्यरत आहेत. सातत्यानं अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. मंत्र्यांशी समन्वय साधत आहेत. करोनाशी लढताना राज्यातील विकासाची कामं थांबू नयेत म्हणूनही ते प्रयत्नशील आहेत.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here