मुंबई: माजी गृहमंत्री यांनी सक्तवसुली संचानलायाच्या () अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. वय, आजारपण आणि करोनाच्या धोक्याचं कारण देशमुख यांनी त्यासाठी दिलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माझी चौकशी करावी, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. ( Refuses To Appear Before Ed)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर देशमुख यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. आतापर्यंत दोन वेळा ईडीनं देशमुख यांच्या घरी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली आहे. दुसरा छापा मागील आठवड्यात टाकण्यात आला होता. त्यानंतर देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना अटकही करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर काही महत्त्वाची माहिती ईडीच्या हाती आली आहे. त्या आधारे ईडीनं आतापर्यंत अनिल देशमुख यांना चौकशीसाठी दोन वेळा समन्स बजावलं आहे. पहिल्या समन्सच्या वेळी देशमुख यांनी वकिलांना पाठवून मुदत मागून घेतली. त्यानंतर ईडीनं दुसरं समन्स बजावत देशमुख यांना (२९ जून) आज चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहता येणार नसल्याचं म्हटलं आहे.

वाचा:

‘आजही मी स्वत: चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. माझं वय ७२ वर्षे आहे. आजारपण आणि करोना होण्याच्या धोक्यामुळे मी हजेरी लावू शकत नाही. त्याऐवजी माझा जबाब ऑनलाइन घ्यावा. ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यास मी कधीही तयार आहे. मात्र, त्याआधी ईडीनं ईसीआर (Enforcement Case Information Report) पाठवावा,’ अशी विनंती देशमुख यांनी केली आहे. माझ्या वतीनं ईडीच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी अधिकृत प्रतिनिधी नेमला आहे,’ असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ‘माझ्याविरुद्ध करण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत,’ याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here