पुण्याच्या प्रश्नांवर राजकारण करत असल्याचा आरोप मोहोळ यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे. ‘महापौर म्हणून मंत्रालयात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात होणाऱ्या बैठकीचं निमंत्रण आपल्याला नाही, हे व्यक्तिशः मलाच नाही, तर पुणेकरांना डावलल्यासारखं आहे. करोना संकटाशी सामना करताना शहराचं हित लक्षात घेऊन आणि राज्य सरकारची भरीव मदत महापालिकेला नसतानाही आपण कधीही राजकारण केलं नाही. उलट मी करोनाबाधित असल्याचा काळ वगळता जवळपास सर्वच बैठकांना उपस्थित राहून आणि समन्वय ठेवून पुढे जात राहिलो. मात्र या महत्त्वाच्या बैठकीलाच आपल्याला जाणीवपूर्वक सहभागी करून न घेणे, हे पुणेकर चांगलंच लक्षात ठेवतील. कारण पुणेकर सुज्ञ आणि स्वाभिमानी आहेत,’ असं मोहोळ यांनी म्हटलं आहे.
गेल्या चार वर्षांत शहरात झालेली विकासाची कामे आणि सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पाची माहिती समस्त पुणेकरांना आहे, असंही मोहोळ यांनी म्हटलं आहे. ‘आपल्याला डावलून का होईना पण शहराच्या प्रश्नांसंदर्भात बैठक होतेय, याचं स्वागतच आहे,’ असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
वाचा:
पुणे महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. सध्या महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात विशेष लक्ष घातलं आहे. पुणे महापालिकेची सत्ता भाजपकडून खेचून घ्यायचीच या जोमानं राष्ट्रवादी कामाला लागली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही स्थानिक प्रश्नांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली आहे. पुण्यातील आंबिल ओढा, रामटेकडी डम्पिंग प्रकल्प असे अनेक प्रश्न सध्या ऐरणीवर आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर होणारी आजची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times