मुंबई: ‘सिगारेट, बिडी ओढणाऱ्यांना करोनाच्या संसर्गाचा अधिक धोका नाही. उलट त्यातील निकोटिन हे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे,’ असा अजब दावा फेडरेशन ऑफ रिटेलर्स असोसिएशन आणि मुंबई बिडी तंबाखू व्यापारी असोसिएशननं मुंबई उच्च न्यायालयात आज केला. ()

करोनाविषयक जनहित याचिकांवरील सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्तींनी यापूर्वी धूम्रपानाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. विषाणूचा हल्ला हा प्रामुख्यानं फुफ्फुसांवर असतो आणि धूम्रपान करणाऱ्यांची फुफ्फुसे कमकुवत होतात, असं वैद्यकीय अभ्यासांमध्ये म्हटलं जातं. मग धूम्रपान करणाऱ्यांना करोनाचा संसर्ग अधिक आहे, असं काही आहे का? याविषयी काही अभ्यास अहवाल आहे का? अशी विचारणा करत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं त्याचा तपशील सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्या अनुषंगानं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी टाटा स्मारक केंद्राच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा अहवाल सादर केला. धूम्रपानामुळं करोनाच्या संसर्गाचा धोका वाढत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

वाचा:

‘टाटा’च्या या अहवालावर तंबाखू व बिडी विक्रेत्यांच्या दोन संघटनांनी मंगळवारी हस्तक्षेप अर्ज दाखल करत आमचंही म्हणणं ऐकावं, अशी विनंती केली. खंडपीठानं दोन्ही संघटनांना हस्तक्षेप करण्याची अनुमती दिली. त्यावेळी एका अहवालाच्या आधारे संघटनांनी हा दावा केला. खंडपीठानं यावर आश्चर्य व्यक्त केलं. ‘सिगारेट, बिडी विक्रेत्यांच्या संघटनांचा हा दावा स्वीकारायचा झाला तर केंद्र सरकारनं अशा उत्पादनांवर जो वैधानिक इशारा छापण्याचं बंधनकारक केलं आहे तो इशाराचा काढून टाकण्याचं पाऊल केंद्र सरकारनं उचलायला हवं’, असं उपहासात्मक निरीक्षण खंडपीठानं नोंदवलं. याविषयी पुढील तारखेला तपशीलवार सुनावणी घेऊ, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here