सोलापूर: बार्शी तालुक्यातील जवळगांवात बार्शी पंचायत समितीचे सभापती यांच्या विरोधात आरटीआय कार्यकर्त्यावर गोळीबार केल्याप्रकरणी वैराग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डिसले यांनी गावातीलच राजकीय विरोधक आणि आरटीआय कार्यकर्ते यांच्यावर गोळीबार केला होता. ही घटना २३ जूनच्या सकाळी घडली. त्यावेळी वैराग पोलिसांनी सभापतींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास चालढकल केल्याची तक्रार करण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण वरिष्ठांकडे गेल्यावर शेवटी सोमवारी रात्री उशिरा सभापती डिसले यांच्याविरुद्ध वैराग पोलिसांनी रीतसर गुन्हा दाखल केला आहे. (a case registered against )

प्रमोद डेंगळे हे आपल्याच जवळगावातील ग्रामपंचायत आणि तालुक्याच्या पंचायत समितीच्या विकास कामांबाबत माहितीच्या अधिकारातून माहिती सातत्याने माहिती मागत. त्याच रागातून वादाची सुरुवात झाली होती. त्यामुळे कोल्हापूर रेंजच्या आयजी ऑफिसला प्रमोद ढेंगळे (रा.जवळगांव) यांनी बार्शी पंचायत समितीचे सभापती अनिल बाबुराव डिसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांपासून आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रार २२ जूनला केली होती.

क्लिक करा आणि वाचा-
या नंतर आपल्या विरोधात पोलिसांत तक्रार दिल्याची कुणकुण सभापती डिसले यांना लागली. २३ जूनच्या सकाळीस्टँडवरुन प्रमोद आपल्या हे घराकडे जात असताना गावात पंचायत समितीचे सभापतींच्या दारात आले असता डिसले यांनी ढेंगळे यांच्या डोक्याला रिव्हॉलर लावून तुला आता जिवंतच ठेवत नाही, अशी धमकी देत अर्वाच्च शिव्या दिल्या. शिव्या देत मी तालुक्याचा सभापती आहे, एक-दोन मर्डर तर सहज खपवू शकतो, आमदार आमचाच आहे. पोलीस स्टेशन त्यांच्या खिशात आहे. कारण, या अगोदर तुम्ही ज्या तक्रारी दिल्या त्याचे पोलीस स्टेशनने काय केले? माझे, हे तुम्हाला माहीतच आहे, असे धमकावत असताना ढेंगळे यांनी तेथून पळ काढला.

क्लिक करा आणि वाचा-
मग डिसले हे पाठलाग करीत असताना त्यांनी एक गोळी झाडल्याचा आवाज झाला. पण ती गोळी लागली नाही. थोडक्यात ढेंगळे बचावले, असे वैराग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

अनिल बाबुराव डिसलेसह त्यांचे दोन गावगुंड व्यंकटेश कृष्णात ढेंगळे आणि सुरेश विश्वनाथ कापसे यांच्यापासून मला संरक्षण मिळावे व त्याच्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशा स्वरूपाची लेखी विनंती वजा तक्रार पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचेकडे केली होती. तसेच यापूर्वी ही गावातील त्यांचे सहकारी व्यंकटेश कृष्णात ढेंगळे, सुरेश विश्वनाथ कापसे आणि सभापती अनिल बाबुराव डिसले यांच्यावर वैराग पोलीस स्टेशनला ब-याच तक्रारी आहेत. पण वैराग पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधातील तक्रारीची दखल घेतली जात नाही, अशी तक्रारही दिलेली होती. त्यानंतर वैराग पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा वैराग पोलीस ठाण्यात अनिल डिसले यांच्याविरुद्ध भादवी कलम ३०७ व शस्त्र अधिनियम ३ व २५ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
गावपातळीवरील राजकीय वर्चस्व वादाची किनार असलेल्या या प्रकरणात पोलीसांनी सावधपणे पुढील तपास सुरु केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here