चित्रा वाघ यांनी ट्विट करत ही टीका केली आहे. वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की संजय राऊत यांच्या अस्वस्थेमुळे महाविकासआघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरून दिसत आहे.
एकच कोडे आहे आणि ते म्हणजे कुणीही हरामखोर म्हटलेले नसताना ‘मी हरामखोर नाही’हे का सिद्ध करावं लागतंय?’, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
त्यांनी ट्विटमध्ये संजय राऊत यांना आवाहनही केले आहे. संजय राऊत यांनी ६ आठवड्यांचे विधिमंडळाचे बोलवावे आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपले मत व्यक्त करावे, असे आवाहन त्यांनी राऊत यांना केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
खासदार संजय राऊत यांनी मात्र असा प्रकारची चर्चा अयोग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज आहेत या चर्चेला काही अर्थ नाही. तिन्ही पक्षांचे व्यवस्थित सुरु आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मनुष्य म्हटल्यावर मतभेद आलेच. पण नाराज कुणीच नाही, असे राऊत यांनी स्पश्ट केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
शरद पवार हे अहमदाबादमध्ये कुणालाही भेटले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेटीवर देखील भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असली तरी त्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचे राऊत म्हणाले. या दोन्ही बैठकांमध्ये काहीही राजकारण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times