: दारूच्या नशेत बापानेच आपल्या दीड वर्षीय मुलीला हौदात बुडवून जीवे मारल्याची हृदयद्रावक घटना औसा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी मृत मुलीच्या आजोबांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
.
मुलांसाठी माता-पिता स्वतःचे प्राणही संकटात टाकतात. आपल्या लेकरांना जगातील सर्व सुख मिळावं यासाठी अहोरात्र कष्ट करतात. मात्र दारूचे व्यसन एकदा जडले की स्वतःच्या जिवाचेच नव्हे तर अख्ख्या कुटुंबाचे हाल होतात. दारूमुळे अनेकांनी स्वतःचा जीव गमावल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. पण याच दारुच्या नशेत जन्मदात्या बापानेच आपल्या मुलीला संपवलं आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना औसा तालुक्यातील आशिव येथे घडली.

११ वर्षापूर्वी पूजा हिचा विवाह आशिव येथील संतोष भोंड याच्याशी झाला. ३ अपत्यांनी त्यांच्या संसाराची वेल फुलली १ मुलगा विश्व आणि ईश्वरी व सृष्टी अशा २ मुली त्यांना झाल्या. मात्र संतोष दारूच्या अधिकच आहारी गेला. पूजाला तो सतत मारहाण करू लागला. त्याच्या जाचाला कंटाळून पूजाने महिला तक्रार निवारण तसेच भादा पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र संतोषमधे कसलाही बदल झाला नाही. तो व्यसनाच्या इतका आहारी गेला की त्याने पोटच्या पोरीचाच नशेत जीव घेतला.

घरचे सगळे शेतात गेले असता घरी असलेल्या सर्वात लहान दीड वर्षीय श्रुष्टीला बापानेच मारहाण करून घरातील हौदात बुडवले. ही घटना श्रुष्टीच्या भावंडांनी रात्री घरी परतलेल्या आजोबाला सांगितली. आजोबाच्या फिर्यादीवरून संतोष भेंडेवर भादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, निष्पाप चिमुकलीला आपले प्राण गमवावे लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here