, इतके वर्ष आपण उगाच दूर होतो. मधली वर्षे आपण उगाच वाया घालवली. उगाचच इतकी वर्ष वेगळं राहिलो. आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, अशी खंत व्यक्त करतानाच आता पहिल्यांदाच तिन्ही पक्ष एकत्र आल्याने जे काही चांगलय करायचं आहे, ते करून दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज किल्ल्यावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नागरी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळही उपस्थित होते. अजितदादा, इतके वर्ष आपण उगाच दूर होतो. आता आपण सर्व एकत्र आल्यानंतर एवढी वर्ष उगाच घालावली असं वाटतंय. आता आम्ही एकत्र आलो असून जे काही करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं वचन मी तुम्हाला देतो, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. महाविकास आघाडीचं सरकार हे माझं सरकार आहे. हे आपलं सरकार आहे. ही भावना गोरगरीब आणि सर्व सामान्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न असतील, असंही त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असताना गर्दीतून एकाने अचानक ते शिवस्मारकाचे लवकर बघा, अशी मागणी केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी हसून दाद दिली. होय सगळं बघतो. आज लोकांचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका. शिवनेरी आणखी कशी सजावयची याकडे आम्ही लक्ष देतो आहोत. हे आपलं वैभव आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
शिवनेरीसाठी २३ कोटी
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्याचा कायापालट आणि सुशोभिकरण करण्यासाठी २३ कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. शिवनेरीवरील गर्दी पाहता राज्यात खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य आलंय हे स्पष्ट होतंय, असं पवार म्हणाले.
मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार
यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचंही स्पष्ट केलं. कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येईल, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी एल्गार परिषदप्रकरणावरून मुख्यमंत्र्यांशी कोणतेही मतभेद नसल्याचंही स्पष्ट केलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times