आजच्या २३१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ०९ हजार ५४८ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १७ हजार ०९८ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुण्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात हा आकडा १६ हजार ४६७ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाण्यात एकूण १५ हजार ९३५ इतके रुग्ण आहेत. मुंबई महापालिका हद्दीत सध्या १२ हजार ६८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १० हजार ६१२ इतकी आहे. सांगलीत ही संख्या १० हजार ३५३, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ५९६, रत्नागिरीत ५ हजार ६१६, रायगडमध्ये ५ हजार ४५८, सिंधुदुर्गात ४ हजार ६७७, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ४९८ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३४० इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच अहमदनगरमध्ये ३ हजार ४०८ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १ हजार २२०, नांदेडमध्ये ही संख्या ८२६ इतकी आहे. जळगावमध्ये ९३२, तसेच अमरावतीत ही संख्या ४२७ इतकी आहे, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ८९ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा-
६,२१,३७७ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी १३ लाख ९८ हजार ५०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ५१ हजार ६३३ (१४.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख २१ हजार ३७७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार ५८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times