परभणी : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून भाजपकडून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपकडून होत असलेल्या टीकेला नेते आणि कॅबिनेट मंत्री यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

‘ प्रकरणी फडणवीस सरकारने डाटा दिला असता तर आज ही वेळ आली नसती. ओबीसी डाटा नीती आयोगाकडे उपलब्ध आहे. मी पंतप्रधानांना विनंती केली होती. मात्र त्याकाळात आम्हाला हा डेटा देण्यात आला नाही. तसंच केंद्र सरकारने फडणवीस यांनाही हा डेटा दिला नाही. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे,’ असा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आज परभणी दौऱ्यावर होते. जिल्ह्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी ते परभणीत आले होते. यावेळी माध्यमांशी बातचीत करताना चव्हाण यांनी भाजपवर आरक्षणावरून राजकारण करण्याचा आरोप केला.

मराठा आरक्षणावर काय म्हणाले चव्हाण?
‘देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असताना विधिमंडळात मराठा आरक्षणाचा कायदा पास केला. मात्र तेव्हा राज्य सरकारला तो अधिकार नव्हता. तरी त्यांनी कायदा पास केला आणि त्याही वेळी आम्ही तो अधिकार आपला नाही असं सभागृहात सांगितलं होतं. त्यावेळी माझ्यावर हक्कभंग आणण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्यमंत्री, मी आणि उपमुख्यमंत्री पंतप्रधान मोदींना भेटलो तेव्हा मोदींनाही मी हेच समजावून सांगितलं, निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला आहे. तुम्ही निर्णय घ्या आमचा पाठिंबा आहे ,’ असं अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी पेट्रोलच्या वाढत्या किमतीबद्दलही टीका केली. राज्यातील नेते एवढी आंदोलने करतात, पण पेट्रोलच्या प्रश्नावर एकही आंदोलन करत नाहीत, असा टोला चव्हाण यांनी लगावला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here