मुंबई : (Nana Patole) यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. या पदाच्या निवडणुकीसाठी (Maharashtra ) राज्य सरकारकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून करण्यात येत आहे. तसंच विधानसभेचं पावसाळी अधिवेशनही काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षपदासाठी पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून कोणता उमेदवार मैदानात उतरवायचा, याबाबतची चाचपणी करण्यासाठी केंद्रातील काही काँग्रेस नेते पुढील शनिवारी मुंबईत दाखल होणार आहेत.

‘इकॉनॉमिक्स टाइम्स’च्या वृत्तानुसार, काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील हे इतर काही नेत्यांसह मुंबईत येऊन राज्यातील काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळातही बदल होण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्रिपद मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी दिल्लीत जाऊन पक्षनेतृत्वाची भेट घेतली होती. पटोलेंच्या दिल्लीवारीनंतरच या घडामोडींना वेग आला आहे.

कोणत्या नेत्यांचं मंत्रिपद धोक्यात?
नाना पटोले हे मंत्रिपदासाठी इच्छुक असले तरी सध्याच्या स्थितीत मंत्रिमंडळात एकही पद रिक्त नाही. त्यामुळेच उर्जामंत्री यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगून त्यांना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवण्यासाठी पटोले हे प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. राऊत यांनी या बदलासाठी नकार दिल्यास मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि बहुजन विकास मंत्री यांना मंत्रिपदाचा राजीनामा देऊन या पदासाठी तयार केलं जाईल, अशीही चर्चा रंगत आहे.

दरम्यान, नाना पटोले यांच्याकडून असे प्रयत्न होत असल्याच्या चर्चेने नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार हे दोघेही नाराज असल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी आणखी कोण आहे स्पर्धेत?
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून काही अनपेक्षित नावांचाही विचार होण्याची शक्यता आहे. यामध्ये आमदार संग्राम थोपटे, आमदार सुरेश वरपूडकर आणि आमदार अमीन पटेल यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, या महत्त्वाच्या पदासाठी अनुभवी चेहरा देण्याचा विचार काँग्रेसने केल्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नावंही काँग्रेसकडून पुढे आणलं जाऊ शकतं. या निवडणुकीत काँग्रेस देत असलेल्या उमेदवाराच्या नावावर शिवसेना आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांची सहमती आवश्यक ठरणार आहे. कारण या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचा हा उमेदवार असणार आहे.

या पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी काँग्रेस पक्षात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here