गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकार कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. असे असताना देवेंद्र फडणवीस फक्त त्रास देण्याचे काम करत आहेत, अशी टीका भास्कर जाधव यांनी फडणवीसांवर केली आहे. राज्यावर कोणतेही संकट आल्यानंतर सर्वजण पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येतात आणि संकटांचा सामना करतात, असे आपण आतापर्यंत राजकारणात पाहत आलो आहोत. मात्र, दोन वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला फक्त त्रास देण्याचे काम केले आहे. त्यामुळे माझ्या मते त्यानी राजकारणातुन संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच तरी संपेल, अशी घणाघाती टीका करतानाच त्यामुळे फडणवीस यांनी राजकीय संन्यास घ्यावाच, असे आवाहनही भास्कर जाधव यांनी फडणवीसांना केले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
‘फडणवीस सरकारमुळेच ओबीसींचे आरक्षण गेले’
काँग्रेसने देखील फडणवीस यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशाने चालणारा भारतीय जनता पक्ष, केंद्रातील मोदी सरकार व तत्कालीन फडणवीस सरकारमुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात ओबीसींची आकडेवारी द्यायला हवी होती. ती जर दिली असती तर ही वेळच आली नसती. पण भाजपने ते जाणीवपूर्वक होऊ दिले नाही. असे असतानाही आता भाजपा नेते ओबीसींचा आम्हाला कळवळा असल्याचे दाखवत आहेत, अशी टीका पटोले यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, फडणवीस यांची नौटंकी महाराष्ट्राला समजली आहे. आता राज्यातील जनताच देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून संन्यास देईल.
क्लिक करा आणि वाचा-
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times