मुंबई: राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली (Ganeshotsav Guidelines) जाहीर केली आहे. यात गणेशमूर्तींच्या उंचीवर मर्यादा घालण्याबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना काही सूचना आणि नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. यावरून आता विरोधक महाविकास आघाडी सरकारवर टीका करू लागले आहेत. भाजपचे आमदार अॅड. (Ashish Shelar) यांनी या नियमावलीला जाचक नियमावली म्हटले आहे. (bjp mla criticizes on by state govt)

गणेशोत्सवावर ठाकरे सरकारने लादलेले निर्बंध एकतर्फी आहेत. गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल गणेशोत्सव महासंघ आणि मूर्तीकार संघटना महाविकास आघाडी सरकारशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न करत होत्या. मात्र सरकारने कोणालाही विश्वासात न घेताच ही नियमावली जाहीर केली, असे शेलार म्हणाले. गणेशमूर्तींच्या कारखान्यांमध्ये मूर्त्या तयार करण्याचे काम गणेशोत्सवाच्या ४ महिने अगोदरच सुरू होत असते. तेव्हा पासूनच मूर्तीकार सरकारकडे विचारणा करत होते. मात्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे शेलार म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
सरकारने ही नियमावली सर्वसमावेशक भूमिका न घेताच जाहीर केल्याचे सांगत घरगुती गणपतीची मूर्ती २ फुटांचीच असावी असा नियम का लावण्यात आला, असा सवालही शेलार यांनी विचारला आहे. घरगुती गणपतीच्या मूर्ती तर कारखान्यात तयारही झालेल्या आहेत. मग आता त्यांचे काय करणार? या रोजगारावर अवलंबून असणाऱ्या कारागीर, कारखानदारांना सरकार काय मदत देणार आहे, असे सवालही शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
हा उद्योग गेल्या वर्षापासूनच अडचणीत आला आहे. सरकारने त्यांना मदत करणे तर सोडाच, पण आता अशा प्रकारचे निर्बंध घालून सर्वांची कोंडी करण्याचे कामच ठाकरे सरकार करत असल्याची टीका शेलार यांनी केली आहे. हा निर्णय एकतर्फी असून तो लोकशाहीत मान्य होण्यासारखा नसल्याचेही ते म्हणाले. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करण्याची आवश्यकता असून बंधने घालायचीच असतील तर मूर्तीकारांना सरकारने मदतीच पॅकेज जाहीर करावे, असे शेलार यांनी सरकारला आवाहन केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here