औरंगाबाद: आकाशवाणी कडून सिडको चौकाकडे जाणारी भरधाव कार सेवन हिल उड्डाणपुलाच्या दुभाजकावर चढून अपघात झाला. ही घटना मंगळवारी (२९ जुन) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. (car acident in no casualty reported)

या घटनेबाबत कार मालक अरुण टेकाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा भाऊ सुनील टेकाळे आणि मुलगा अथर्व टेकाळे (१८, एसबीओए शाळेसमोर नंदादीप हाऊसिंग सोसायटी) हे औरंगपुरा येथून सिडको बस स्थानक चौकाकडे त्यांची कार क्रमांक एमएच २० ईजे ९६१३ खाजगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा डबा आणण्यासाठी जात होते. आकाशवाणी कडून सेवन हिल उड्डाण पुलावर कार येताच पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला हुलकावणी दिली. यावेळी सुनील टेकाळे हे कार चालवत होते.

क्लिक करा आणि वाचा-
ट्रकने हुलकावणी दिल्यामुळे टेकाळे यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर चढली. उड्डाणपुलावरील दुभाजकावर कार अंदाजे ५० मीटर अंतरापर्यंत पुढे गेली. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार टेकाळे चालवत असलेल्या कारची गती देखील जास्त होती.

क्लिक करा आणि वाचा-
अपघाताची माहिती कळताच जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अशोक शिर्के, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर चव्हाण, अवध सोंगकलंगी यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी कोणताही गुन्हा जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला नव्हता.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here