मुंबई- अभिनेत्री चे पती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. १९९९ मध्ये मंदिरा आणि राज यांचे लग्न झाले होते.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी राज कौशल यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राज कौशल यांच्या कुटुंबाचा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, ‘मंदिरा बेदी यांचे पती आणि अॅड फिल्ममेकर राज कौशल यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या बातमीने आम्ही सारेच धक्क्यात आहोत.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times