मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार यांनी मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबतच मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाहीत, अशी खंतही शेट्टी यांनी पवारांकडं व्यक्त केली. त्यावरून भारतीय जनता पक्षानं राजू शेट्टींवर खोचक शब्दांत टीका केली आहे. (Bjp MLA Taunts over Meeting with )

‘केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडं वेळ मागितली होती. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही,’ अशी नाराजी शेट्टी यांनी पवारांकडं व्यक्त केली होती. पवार यांनी शेट्टींच्या तक्रारीची दखल घेत या विषयात लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं. या भेटीच्या अनुषंगानं भाजपचे प्रवक्ते, आमदार यांनी एक ट्वीट केलं आहे.

‘काय दिवस आलेत राजू शेट्टींवर, ज्या पवारांनी त्यांची जात काढली त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांना अश्रू ढाळावे लागतायत. नियतीचा सूड म्हणतात तो हाच…,’ असा टोला भातखळकर यांनी हाणला आहे.

नगरमधील हाणामारीवरून शिवसेनेवर टीका

अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकीच्या वादातून शिवसेनेच्या दोन गटात मंगळवारी रात्री राडा झाला होता. आर्थिक देवाणघेवाणीतून ही हाणामारी झाल्याचं समोर येत आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. या वृत्ताचा हवाला देत भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘विश्वासघात करून मिळालेली सत्ता कधीच पचत नाही. जिथं सर्वोच्च नेतेच सत्तेसाठी हपापलेले आहेत, तिथं सामान्य कार्यकर्त्यांची काय कथा,’ असं भातखळकर यांनी दुसऱ्या एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here